IND vs PAK: स्मृती मानधनाकडून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी थोडक्यात हुकली! 28 वर्षांचा जुना रेकॉर्ड कायम
विश्वकप 2025 मध्ये स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) फलंदाजी अजून खास पद्धतीने दिसलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ती काही कमाल कामगिरी करू शकली नाही. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धही तिची खेळी प्रभावी ठरली नाही (IND vs PAK). पाकिस्तानविरुद्ध स्मृती मानधना कमी धावसंख्येवर बाद झाली. या सामन्यात तिने फक्त 23 धावा केल्या आणि त्यामुळे एक मोठा विश्वविक्रम गाठण्याची संधी तिने गमावली. त्याचबरोबर अजून एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधीही तिच्या हातून हुकली.
जर स्मृती मानधनाने पाकिस्तानविरुद्ध 43 धावा केल्या असत्या तर ती एका वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली असती. पण ती केवळ 23 धावांवर माघारी परतली. याशिवाय, ती वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावा करणारी दुसरी भारतीय खेळाडू होण्याची संधीही गमावून बसली.
एका वर्षात सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कच्या नावावर आहे. त्यांनी 1997 मध्ये 970 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर स्मृती मानधना आहे, जिने 2025 मध्ये आतापर्यंत 951 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेची लारा वूलव्हार्ट आहे जिने 2022 मध्ये 882 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडची डेबी हॉकले ज्यांनी 1997 मध्ये 880 धावा केल्या होत्या आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडची एमी सॅटरथवेट आहे जिने 2016 मध्ये 853 धावा केल्या आहेत.
Comments are closed.