रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर, मोहम्मद कैफचं वक्तव्य चर्चेत! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohmmed kaif on Rohit Sharma’s Captaincy) रोहित शर्माविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कैफने सांगितले की, मुंबईचा हा खेळाडू नेहमी फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा संघात निवडला गेल्यानंतर कैफने आपल्या यूट्यूब चॅनेलवर याबाबत बोलताना सांगितले, मी आयपीएलदरम्यान काम करत होतो. त्या वेळी मी मुंबईतील वानखेडे स्टेडियमजवळ असलेल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे मुंबई इंडियन्सचे खेळाडूही थांबले होते. संयोगाने आम्ही समालोचकही त्याच हॉटेलमध्ये राहिलो. त्यामुळे आम्ही अनेकदा भेटलो. तेव्हा जेव्हा- जेव्हा मी रोहित शर्माला भेटलो, तो फक्त क्रिकेटबद्दलच बोलत असे.

रात्री 11.30 किंवा 12 वाजताही जेव्हा तो वानखेडेवरून सराव करून परतत असे, तेव्हाही तो टीमसाठी योजना आखू आखायचा. दुसऱ्या दिवशी कोण खेळणार, संघरचना काय असणार, खेळाडूंशी कसे बोलायचे, त्यांना काय समजावायचे या सगळ्या गोष्टींबद्दल तो विचार करत असायचा.

कैफने पुढे सांगितले, याचा सरळ अर्थ असा की रोहित मैदानाबाहेरही कर्णधार आहे. रात्री त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगी असायची, पण तो आपल्या कुटुंबाला वेळ देण्यापेक्षा संघासाठी वेळ खर्च करायचा. म्हणूनच तो फक्त मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेरही खरा कर्णधार आहे. त्याने आपलं तन-मन देशासाठी समर्पित केलं आहे.

अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्माला संघात तर ठेवण्यात आलं आहे, पण कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आलं आहे. या मालिकेत शुबमन गिल (Shubman gill) भारतीय संघाचं नेतृत्व करणार असून उपकर्णधाराची जबाबदारी श्रेयस अय्यरवर (Shreyas iyer) सोपवण्यात आली आहे.

Comments are closed.