रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेणं बरोबर? BCCI ने या कारणामुळे शुबमनला सोपवलं कर्णधारपद
मागच्या शनिवार BCCI ने ऑस्ट्रेलियातील दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केला होता. यामध्ये सगळ्यात धक्कादायक निर्णय म्हणजे रोहित शर्माला (Rohit Sharma) काढून वनडे संघाचे नेतृत्व शुबमन गिलला (Shubman gill) देणे. रोहित शर्मा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे, त्याने गेल्या वर्षभरात संघाला 2 आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. या कारणांमुळे रोहितला कर्णधारपदावरून काढणे खूपच धक्कादायक ठरले.
IPL मध्ये मुंबई इंडियन्सला त्याच्या नेतृत्वाखाली 5 विजेतेपद मिळवून दिलेला रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा परफॉर्मन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा सिद्ध करणे सोपे नव्हते. मात्र रोहितचे आकडे दाखवतात की, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला किती यश मिळाले. रोहितने 56 वनडे सामने कर्णधार म्हणून खेळले, त्यात संघाने 42 सामने जिंकले. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाची जिंकण्याची टक्केवारी 75% होती. 10 हून अधिक सामने खेळलेल्या भारतीय वनडे कर्णधारांमध्ये रोहितचा ही टक्केवारी सर्वात चांगला होती.
अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढणे योग्य होते का? रोहित शर्मा आता 38 वर्षांचा झाला आहे, 2027 ODI वर्ल्ड कपपर्यंत त्याचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त होईल. अनेक चाहत्यांना हवे असेल की, रोहित पुढील काही वर्षे क्रिकेट खेळेल , परंतु 2027 वर्ल्ड कपपर्यंत त्याला IPL व्यतिरिक्त फारसे सामने खेळता येणार नाहीत. कमी सामने खेळणे, गेम अवेअरनेस आणि फिटनेस टिकवणे कठीण ठरेल.
आता भारतीय क्रिकेट शुबमन गिलच्या (Shubman gill) युगात प्रवेश करत आहे असे म्हणता येईल. गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-2 बरोबरी साधून आपल्या नेतृत्व कौशल्याचे प्रदर्शन केले आहे. टीम इंडियाचे प्रमुख निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी देखील स्पष्ट केले आहे की, 3 वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार असणे संघासाठी चांगले नाही. शुबमन गिलला नेतृत्व देण्याची योग्य वेळ आहे कारण तो किमान पुढील दशकभर संघाचं नेतृत्व करू शकतो. त्यासाठी त्याला आता हळूहळू तयार केले जात आहे.
Comments are closed.