विवेक कोल्हे तुम्ही चिंता करु नका, तुमच्याबद्दल अमित भाईंनी विचारले, नेमकं काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फड्नाविस: विधानसभा निवडणुकीत विवेख कोल्हे यांना विनंती केली, त्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद दिला. महायुती म्हणून आशुतोष काळे यांना निवडून दिले. विवेक कोल्हे तुमच्या राजकीय भविष्याची चिंता आम्ही आणि अमितभाई करतील असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमित भाई यांनी गाडीत तुमच्याबद्दल विचारले होते, त्यामुळं तुम्ही चिंता करू नका असे फडणवीस म्हणाले.
100 टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतीलअसे प्रकल्प सुरु
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोपरगाव मधील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाच्या देशातील पहिल्या CNG अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन झाले. दररोज या प्रकल्पाच्या माध्यमातून 12 टन CNG ची निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 100 टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील ते असे प्रकल्प आहेत. CNG निर्माण करणे हे त्याचे पुढचे पाऊल आहे. जे वेस्ट होत होते त्याचाही उपयोग होणार आहे. कचऱ्यापासून गॅस तयार केला आहे. गॅस तयार करताना जो कचरा निर्माण होतो त्यापासून पोटॅश तयार केलं जाणार आहे. यात काहीच वेस्ट होणार नाही. 1 लाख 10 हजार लिटर पेट्रोल रोज आपण वाचवणार आहोत. पैसेही वाचणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
पोटॅश आयात आणावे लागायचे ते आता गरज पडणार नाही. कारण शेतकरी आता ऊर्जादाता होणार आहे. ही मोदीजींची दूरदृष्टी आहे. आम्हाला असे नवनवीन प्रयोग करणासाठी केंद्र सरकार मदत करणार असे अमित शहा यांनी सांगितले. ही नवीन विचार आणला त्याचे प्रणेते विवेक कोल्हे आहेत असे फडणवीस म्हणाले. जवळपास 40 टक्के शेती त्यावरील पीक वाहून गेले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अमित शाहा, मोदीजी आमच्या पाठीशी आहेत. शेतकऱ्यांचे दुःख भरून काढता येत नाही पण शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकेल,यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले.
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सहकार क्षेत्रातील पहिला CNG प्रकल्प उभा राहिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको अन्नदाता सोबत उर्जादाता झाला पाहीजे असा विचार मांडल. सहकार क्षेत्रात इथेनॉल सुरु केला, साखरेच्या किंमतीमधील नुकसान भरुन काढण्यासाठी मदत झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारनं उत्तम निधीचा स्रोत निर्माण केला आहे. जगासमोर वातावरण बदलाचा प्रश्न आहे. आपण अनुभव घेत आहोत, मे मध्ये पाऊस सुरू झाला आता ऑक्टोबर मध्येही पाऊस पडतो आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.