Virar News – म्हारंबळपाडा जेट्टीजवळ रो-रो बिघडली, 200 पेक्षा जास्त प्रवासी अडकले

सफाळे–विरारमध्ये चालणारी रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली आहे. या बोटीत 200 प्रवासी असून 75 पेक्षा जास्त गाड्या आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असल्याने या बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन तासांपासून प्रवासी बोटीत अडकून पडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Comments are closed.