टीम इंडियासाठी सर्वोत्तम कामगिरी करूनही रोहितच्या पदरी अपमानचं! वनडे क्रिकेटमधून देखील घेणार निवृत्ती?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली (Rohit Sharma’s under Captaincy) भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली होती. त्यानंतर आता भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील वनडे मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे, पण संघ घोषित झाल्यावर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
एका वर्षात दोन ICC ट्रॉफी जिंकवून दिल्या, तरीही आता रोहित भारताचा कर्णधार नाही. टी20 आणि कसोटीमधून तर रोहितने आधीच निवृत्तीची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत जर त्याच्या पदरी निराशाच येत असेल तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.
गेल्या 15–16 महिन्यांत रोहित शर्माने टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टी20 फॉरमॅटमधून त्याने स्वतः निवृत्तीची घोषणा केली, पण कसोटीमधून त्याने दबावाखाली निवृत्ती घेतली अश्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या.
आता वनडे संघाचं कर्णधारपद सुद्धा त्याने गमावलं, त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. रिपोर्ट्सनुसार असेही म्हटले जात आहे की, जर त्याचा असा सतत अपमान चालू राहिला, तर लवकरच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटला देखील निरोप देऊ शकतो.
Comments are closed.