भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लोळवलं, 88 धावांनी विजय


भारत महिला वि पाकिस्तान महिला विश्वचषक कोलंबो: भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला 159 धावांवर बाद करत मोठा विजय मिळवला आहे. भारतानं हा सामना 88 धावांनी जिंकला आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 248 धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग 12 वेळा विजय मिळवला आहे.  भारत या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे या स्पर्धेत दोनवेळा पराभव झाले आहेत.

India Beat Pakistan : भारताचा पाकिस्तानवर विजय

महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये सहाव्या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानं 50 ओव्हरमध्ये 247 धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक धावा हरलीन देओल हिनं केल्या. तिनं 46 धावा केल्या. पाकिस्तानकडून बैग आणि सना यांनी 2-2 विकेट घेतल्या.

247 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मनीबा अली रन आऊट झाली. सदफ शमास 6 धावा करुन बाद झाली. क्रांति गौड हिनं 3 विकेट घेतल्या. आळिया रियाझ 2 धावा करुन बाद झाली.  नतालिया परवेझनं 46 धावा केल्या. कॅप्टन फातिमा सना केवळ 2 धावा करु शकली.  सिदरा नवाज हिनं 14 धावा केल्या सिद्रा अमीन हिनं 81धावांची खेळी केली.

भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना 23 धावा करुन बाद झाली. प्रतिका रावलनं 31 धावा केल्या. हरमनप्रीत कौर 19 धावा करु शकली. हरलीन देओलनं 46 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं 32  तर स्नेह राणानं 20 धावा केल्या. रिचा घोषनं 35 धावा केल्या.भारताकडून क्रांती गौडनं 3 विकेट घेतल्या. दिप्ती शर्मानं 3 आणि स्नेह राणानं 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, पुरुष क्रिकेट संघाप्रमाणं भारताच्या महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर सलग 12 व्या मॅचमध्ये विजय मिळवला. भारताची गोलंदाज क्रांती गौड हिला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवले जात आहेत. वनडे वर्ल्ड कपचं आयोजन भारताकडे असल्यानं पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होत आहेत. कोलंबोत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.