नेपाळमध्ये पावसामुळे हाहाकार; 47 ठार

जेन झी आंदोलनातून सावरत असलेल्या नेपाळवर आता अस्मानी संकट कोसळले आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी भूस्खलन होऊन 47 जणांचा मृत्यू झाला आहे. 11 जण बेपत्ता आहेत. तर, इतर घटनांमध्ये 13 जखमी झाले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व इलाम जिह्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. येथे विविध घटनांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Comments are closed.