एअर इंडियाच्या विमानाचे इर्मजन्सी लँडिंग, बर्मिंगहम एअरपोर्टवरील घटना

अमृतसरहून बर्मिंगहॅमकडे जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787-8 विमानाचे शनिवारी यूकेमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लँडिंग करण्यापूर्वी विमानाचे एअर टर्बाइन म्हणजेच रॅम एअर टर्बाइन आपोआप हवेतच सक्रिय झाले. ही घटना बार्ंमगहॅम विमानतळावर घडली. विमानातील रॅम एअर टर्बाइन प्रणाली हे एक उपकरण असते.साधारणपणे जेव्हा विमानाचे सर्व इंजिने काम करणे बंद करतात, तेव्हा ही प्रणाली आपोआप कार्यान्वित होते.

याच मॉडेलचे बोईंग ड्रीमलाइनर 787-8 विमानाचा जून महिन्यात अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला होता, ज्यात रॅम एअर टर्बाइन यंत्रणादेखील कार्यान्वित झाली होती.

विमान कंपनीचे स्पष्टीकरण

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने बर्मिंगहॅममध्ये सुरक्षितपणे लँडिंग केली. पुढील तपासणीसाठी विमान ग्राऊंड करण्यात आले आहे आणि एआय114 बार्ंमगहॅम ते दिल्ली विमान रद्द करण्यात आले आहे व प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

Comments are closed.