बीसीसीआयने संघात स्थान दिलं नाही, पण ‘या’ फलंदाजाची बॅट तळपली, सिलेक्टर्सना चोख प्रत्युत्तर
एकदिवसीय मालिकेत रियान पॅराग सर्वाधिक धावा विस् ऑस्ट्रेलिया ए: भारत अ संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने (Shrayas Iyer) एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली, परंतु रियान परागने धावा करण्यात त्याला मागे टाकले आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तरीदेखील त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुख्य भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने शेवटच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने बीसीसीआयला चोख प्रत्युत्तर दिलं.
रायन परगाची भव्य खली
ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात रियान परागने 55 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने या सामन्यात श्रेयस अय्यरसह महत्त्वाची भागीदारी करत टीमला 24 चेंडू शिल्लक असताना 2 गडी राखून विजय मिळवून दिला. यापूर्वी झालेल्या दोन्ही वनडे सामन्यांतही परागने अर्धशतक ठोकले होते.
पहिल्या वनडेत त्याने केवळ 42 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या होत्या, आणि त्या सामन्यात भारत ‘अ’ने तब्बल 171 धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या वनडेत परागने 54 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 58 धावांची खेळी केली, मात्र त्या सामन्यात भारत ‘अ’ला 9 गडी राखून पराभव पत्करावा लागला. तीनही सामन्यांत परागने जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला, पण त्याला तरीही मुख्य संघात स्थान मिळाले नाही.
तरीही टीममध्ये स्थान नाही…
या महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, जिथे एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी जाहीर झालेल्या संघात रियान परागचा समावेश करण्यात आलेला नाही. रियान परागने आतापर्यंत भारताकडून एकच वनडे सामना खेळला असून त्यात त्याने 15 धावा केल्या आणि 3 बळी घेतले आहेत. तसेच त्याने 9 टी20आय सामने खेळले असून त्यात त्याने 17.66 च्या सरासरीने फक्त 106 धावा केल्या आहेत आणि 4 गडी बाद केले आहेत.
श्रेयस अय्यर ठरला दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज
भारत ‘अ’ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने तीन सामन्यांत एक शतक आणि एक अर्धशतक ठोकत 60.00 च्या सरासरीने 180 धावा केल्या. त्याचा सर्वोत्तम स्कोर 110 धावा इतका राहिला. प्रभसिमरण सिंगने 3 सामन्यांत 159 धावा करून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली, तर तिलक वर्माने दोन सामन्यांत 97 धावा केल्या.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.