थोडीशी मदत अण्णासाठी…! वाल्मिक कराडच्या नावाने आर्थिक निधी द्या; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल,


Beed Crime Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) नावाने सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या बॅनरमध्ये मुंडे बंधू भगिनींचे फोटो झळकले असून, संबंधित प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

या व्हायरल बॅनरमध्ये “वाल्मिक (अण्णा) कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी, तसेच सोशल मीडियावर अण्णांचे नाव आणि चेहरा कायम दिसत राहावा, यासाठी आपले आर्थिक सहाय्य अत्यावश्यक आहे” अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. “फुल ना फुलाची पाकळी… थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी” अशा प्रकारच्या भावनिक अपीलद्वारे निधी मागितला जात असल्याचे या बॅनरवर स्पष्टपणे दिसून येते. या बॅनरमध्ये फोनपे QR कोड देखील देण्यात आले असून, तो संदीप गोरख तांदळे (Sandeep Gorakh Tandale) या व्यक्तीच्या बँक खात्याशी संलग्न असल्याचे उघड झाले आहे.

Beed Crime Walmik Karad:  संदीप तांदळेचा वादग्रस्त इतिहास

संदीप तांदळे ही व्यक्ती यापूर्वीही वादात राहिली आहे. आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि विजयसिंह बांगर यांना उद्देशून तांदळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खुलेआम धमक्या दिल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, सावरगाव येथील भगवान भक्ती गडावरील पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) दसरा मेळाव्यात याच संदीप तांदळेने आरोपी वाल्मिक कराडचा फोटो झळकावल्याची घटना घडली होती, त्यामुळे या नावावर आधारित निधी संकलन मोहीम पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.

Beed Crime Walmik Karad:  ट्रस्टची कारवाईची मागणी, पोलिसात तक्रार

या संपूर्ण प्रकरणामुळे भगवान भक्ती गड ट्रस्टकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, हे बॅनर कोणी तयार केले, याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अंमळनेर पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बॅनरच्या मूळ स्त्रोताचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde Dasara Melava 2025: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात पोलिसांशी हुज्जत घालणं भोवलं; 13 जणांवर कारवाईचा बडगा; नेमकं काय घडलं?

Walmik Karad : We Support Anna, कराड आमचे दैवत…; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर, चर्चांना उधाण

आणखी वाचा

Comments are closed.