पैसे पाठवताना चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? या पर्यायांचा वापर करा
नवी दिल्ली : पैशांचा व्यवहार करताना अनेकदा रोख रकमेचा वापर केला जायचा. मात्र, सध्याच्या काळात प्रत्येक काम ऑनलाईन होत आहे. लोक मोबाईलवरुन शॉपिंग, बँकिंग आणि पेमेंट करतात. नेट बँकिंग आमि यूपीआय द्वारे सर्वाधिक व्यवहार डिजीटल पद्धतीनं केले जातात. यूपीआयद्वारे काही सेकंदामध्ये पेमेंट केलं जातं. मात्र, अनेकदा पैसे चुकीच्या बँक खात्यात किंवा यूपीआय आयडीवर वर्ग केले जातात.
Wrong UPI Transfer Refund : चुकीच्या यूपीआय आयडीवर गेलेले पैसे कसे मिळवायचे?
पैसे चुकीच्या खात्यात गेल्यास लोक घाबरतात. मात्र, घाबरुन जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर पैसे चुकीच्या खात्यात गेले तर तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टी करण्याची गरज आहे. योग्यवेळी निर्णय घेतल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणं आवश्यक आहे.
जर पैसा चुकीच्या बँक खात्यात वर्ग झाले तर तुम्ही तातडीनं बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क केला पाहिजे.यासह ट्रांझॅक्शन आयडी आणि पाठवण्यात आलेल्या रकेमची पूर्ण माहिती द्यावी. यानंतर बँक अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि योग्य खात्यातून पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं ज्यामध्ये बँक स्टेटमेंट आणि स्क्रीनशॉट देखील तयार ठेवावे लागतील. यामुळं प्रक्रिया वेगवान होते. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर तुमचे पैसे परत मिळू शकतात.
चुकीच्या यूपीआय व्यवहाराची तक्रार कशी करायची?
आजकाल लोक साधारणपणे पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर करतात. मात्र, अनेकदा लोक पेमेंट करताना काळजी घेत नाहीत, त्यामुळं चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे वर्ग केले जातात. जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात वर्ग झाले असतील तर पहिल्यांदा यूपीआय ॲपमधून तक्रार नोंदवा. त्यानंतर ॲपच्या कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क करा आणि व्यवहाराची पूर्ण माहिती द्या.
याशिवाय एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे देखील तक्रार करु शकता. तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर पैसे परत मिळू शकतात. जर 30 दिवसात मार्ग निघाला नाही तर तुम्ही एनपीसीआयच्या टोल फ्री क्रमांकावर 18001201740 किंवा upihelp@npci.org.in वर तक्रार करु शकता.
आणखी वाचा
Comments are closed.