Vitamin D : व्हिटॅमिन डी बद्दल आश्चर्यचकित करणारे फॅक्ट, वाचाल तर थक्क व्हाल !
शरीर निरोगी राहण्यासाठी विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आवश्यक असतात. व्हिटॅमिन्समध्ये विविध व्हिटॅमिन्सचा समावेश असतो, व्हिटॅमिन ई पासून ते व्हिटॅमिन बी 12 पर्यंत प्रत्येक व्हिटॅमिन शरीरात वेगवेगळी भूमिका निभावतो. यात ‘व्हिटॅमिन डी’ शरीरासाठी अधिक आवश्यक सांगितले जाते. व्हिटॅमिन डी ला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असेही म्हणतात. व्हिटॅमिन डी हाडांसाठी उपयुक्त असतेच याशिवाय अनेक गोष्टींसाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे. आज आपण एम्स, हार्वर्ड युनिव्हरसिटीच्या डॉक्टरांनी व्हिटॅमिन डी बद्दल आश्चर्यचकित करणारे सांगितलेले फॅक्ट पाहूयात
- व्हिटॅमिन डी हे केवळ एक व्हिटॅमिन नाही तर शरीरासाठी एक हार्मोन आहे. तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी 200 पेक्षा जास्त जीन्स नियंत्रित करतो आणि शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या कामांसाठी कार्य करतो.
- खाण्याच्या खूप कमी पदार्थांपासून व्हिटॅमिन डी मिळते. असे सांगितले जाते की, सॅल्मन, टूना, अंडी, मशरूम या पदार्थात व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त असते. पण, तज्ज्ञांच्या मते या पदार्थांच्या तुलनेत तुम्ही केवळ 15 मिनिटे उन्हात बसल्याने तुमची स्कीन जास्त व्हिटॅमिन डी मिळवते.
हेही वाचा – Relationship: बाळाच्या जन्मानंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवावे? वाचा तज्ञांचे मत
- शरीरात कितीही व्हिटॅमिन डी असले तरी त्याचे निदान केल्यास ते कमीच दिसते. अशा परिस्थितीत, तुम्ही याचे प्रमाण थकवा, वारंवार आजारी पडण्याच्या समस्येवरून ओळखू शकता.
- अनेकजण व्हिटमिन डी च्या सप्लीमेंट्स घेतात. पण, या सप्लीमेंट्स जास्त घेणे महागात पडू शकते. विशेष करून किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स घ्याव्यात.
- व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाश घेणे हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही जर अर्धा तास सूर्यप्रकाश घेतलात तर 1000- 2000 IU व्हिटॅमिन डी मिळवू शकता.
- लहान मुलांनी सप्लीमेंट्सद्वारे व्हिटॅमिन डी देणे चुकीचे आहे. मुलांच्या शरीरात आहारातून आणि सूर्यप्रकाशाच्यामाध्यमातून व्हिटॅमिन डी वाढवावे.
- व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे हे आपल्याला माहिती आहे. पण, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एक गोष्ट समोर आली आहे की, व्हिटॅमिन डी फक्त हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त नाही तर स्नायूंच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
हेही वाचा – दररोज माउथवॉश वापरायचे की नाही? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Comments are closed.