Smartphone Loan : लोनवर स्मार्टफोन घेणे योग्य की अयोग्य?
एकेकाळी भारतीय कर्ज काढून खरेदी करायला घाबरायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे. महागाई दिवसाला वाढत असल्याने कमाई पुरत नाही, ज्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कर्ज काढले जात आहे. पण, यात अनेक चुकीच्या गोष्टींसाठी कर्ज काढण्याचे प्रमाण अधिक आहे. जसे की महागडे स्मार्टफोन. महागडे स्मार्टफोन्स खरेदी करण्याची जणू भारतीयांमध्ये चढाओढ सुरू आहे. बाजारात विविध कंपनीचे फोन उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत अगदी लाखांवर आहे. जेवढा स्मार्टफोन महागाचा तेवढे फिचर्स आपल्याला मिळतात हे खरं आहे. पण त्याची खरेदी करताना महागाचा फोन आपल्याला खरंच गरजेचा आहे का हे तपासणे देखील महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात कर्ज काढून स्मार्टफोन घेणे योग्य की अयोग्य
क्रेझ वाढण्याचे कारण –
आजच्या घडीला अनेक मायक्रो फायनान्सिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, ज्याद्वारे ग्राहकांना सहजपणे कर्ज उपलब्ध होणे. मिळणारे हे कर्ज अत्यंत स्वस्त दरात आणि कमी हफ्त्यांवर असते. याशिवाय डिजीटल पद्धतीने कर्ज मिळते. ज्यामुळे तुम्हाला कागदपत्र घेऊन फिरावे लागत नाही.
हेही वाचा – लांबच्या विमान प्रवासादरम्यान पायलट कशी झोप काढतात?
तज्ज्ञ काय सल्ला देतात?
अर्थतज्ज्ञांच्या मते, लोनवर फोन घेणे योग्य आहे की नाही हे संपूर्णपणे तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि स्मार्टफोनच्या गरजेवर अवलंबून असते. तुमचे स्मार्टफोन घेण्याचे बजेट असेल तर ठीक नाहीतर कर्जामुळे तुम्हाला दर महिन्याला एक रक्कम तयार ठेवावी लागते.
लोनवर फोन घेण्यापूर्वी या गोष्टी विचारात घ्या –
- स्मार्टफोन तुमच्यासाठी किती आवश्यक आहे हे मुद्दे लक्षात घ्यावेत. खरंच गरजेचा आहे की स्टाइल किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून घेत आहात याचे उत्तर शोधा.
- तुमचे मासिक उत्पन्न आणि लोनचा हफ्ता तुम्ही दर महिन्याला भरू शकता का? यावर विचार करावा. महिन्याचा हफ्ता तुमच्या महिन्यातील खर्चांवर परिणाम करणार नाही याची खात्री करावी.
- लोन घेणार असाल तर व्याजदर तपासावे.
- कर्ज प्रक्रियेसाठी किती प्रोसेसिंग फी आहे ते बघा.
- जर तुम्हाला लोन लवकर फेडायचे असेल तर त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागतात का हे तपासा.जर या सर्व गोष्टीचा निष्कर्ष काढायचा झाल्यास तुम्हाला महागड्या स्मार्टफोनची खरंच गरज आहे का की तुमचे कमी पैशांच्या स्मार्टफोनमध्ये काम होऊ शकतो यावर विचार करावा, जर तुम्ही फक्त स्टेटस सिंबॉलसाठी घेत असाल तर लोनवर फोन घेणे तुमच्या आर्थिक बजेटबाहेर जाऊ शकते.
हेही वाचा – हॉटेलमध्ये राहताना ‘या’ फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, जाणून घ्या याचं कारण
Comments are closed.