ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराट- रोहित ODI क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? जाणून घ्या मोठी अपडेट समोर

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे. भारतीय वनडे संघ आता शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions trophy) मध्ये भारताच्या विजयानंतरही रोहित शर्माची (Rohit Sharma) वनडे कर्णधाराची जबाबदारी गिलला देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी हिटमॅन (रोहित शर्मा) कर्णधार नाही, तरी रोहित आणि विराट कोहली (Virat Kohli) दोघेही टीममध्ये आहेत.

टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी टीम जाहीर केल्यानंतर 2027 वर्ल्ड कपबाबत सांगितले की, रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला कर्णधारपद दिले गेले आहे, हे 2027 वर्ल्ड कप लक्षात घेऊन केलेले पाऊल आहे. बीसीसीआय सध्या टीममध्ये युवा खेळाडूंवरही लक्ष ठेवत आहे.

भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्मा आता 38 वर्षांचे झाला आहे. 2027 वर्ल्ड कपपर्यंत त्याचे वय 40 होईल. पुढील दोन वर्षांत भारताला फारसे वनडे सामने नाहीत आणि रोहित फक्त ODI फॉरमॅटमध्ये खेळत आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या मते, रोहितला वर्ल्ड कप खेळायचा असेल, तर त्याला स्वतःला पूर्णपणे फिट ठेवणे आवश्यक आहे. तसेच वनडे व्यतिरिक्त घरगुती क्रिकेट खेळणेही महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तो वर्ल्ड कपसाठी टीममध्ये राहू शकेल.

सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडेमधून निवृत्ती घेण्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही, तसेच 2027 वर्ल्ड कपपर्यंत क्रिकेट खेळायचे आहे की नाही, हेही सांगितलेले नाही. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दोघांबाबत असेही चर्चा होत आहेत की, कदाचित हा ऑस्ट्रेलियामधील त्यांचा शेवटचा दौरा असू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे CEO टॉड ग्रीनबर्ग म्हणाले, “कदाचित आम्ही आपल्या देशात विराट आणि रोहितला शेवटच्या वेळी खेळताना पाहू. आम्हाला त्यांना एक योग्य फेअरवेल द्यायचा आहे, जो त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदान दाखवेल.

Comments are closed.