ट्रम्प भडकले! नेतन्याहूंना फोनवरच हासडली शिवी

गाझामध्ये युद्धबंदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज कमालीचे भडकले आणि त्यांनी फोनवरूनच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना शिवी हासडली. ट्रम्प यांनी दिलेल्या 20 सूत्री शांतता प्रस्तावातील बहुतेक गोष्टी हमासने मान्य केल्या आहेत. इस्रायली बंदिवानांना सोडण्याची तयारी हमासने दाखवली आहे, मात्र इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांना सोडून गाझातून सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी केली.
त्यानंतर ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना गाझातील हल्ले थांबवण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र इस्रायलने हल्ले सुरूच ठेवून तीन दिवसांत शेकडो लोकांचे बळी घेतले. त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना फोन लावला आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तू एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहेस’, असे म्हणत नेतन्याहू यांना शिवीच हासडली.
गाझात युद्धबंदीसाठी इस्रायलनेदेखील काही प्रमाणात नमते घ्यावे अशी ट्रम्प यांची इच्छा आहे, मात्र नेतन्याहू त्यास तयार नाहीत. हमासने काही अटी मान्य केल्या यात खूश होण्यासारखे काही नाही असे ते ट्रम्प यांना म्हणाले. त्यामुळे ट्रम्प भडकल्याचे समजते.
Comments are closed.