2027 वर्ल्ड कपसाठी संघबांधणीसाठी बदल, गावसकरांनी केले नव्या बदलांचे स्वागत

2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानी संघाची नव्याने बांधणी करण्यासाठी बीसीसीआयने संघात काही मोठे बदल केले आहेत. त्याचमुळे अनुभवी रोहित शर्माकडून वनडे संघाचे नेतृत्व युवा शुभमन गिलकडे सोपवण्यात आले असल्याचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विश्वासाने सांगितले. तसेच या निर्णयाचे स्वागत करत येणाऱया काही महिन्यांत आणखी काही धक्कादायक गोष्टी घडणार असल्याचेही संकेत दिले.
भविष्याचा विचार करून घेतलेला निर्णय
गावसकर म्हणाले, रोहित शर्माकडून वनडे नेतृत्व काढून घेतल्यामुळे काहींनी त्याबद्दल नाराजी दर्शवली असली तरी गावसकरांनी या निर्णयाचे भविष्यासाठी बदल म्हणत स्वागत केलेय. पुढील दोन वर्षांत हिंदुस्थान फारच कमी वनडे सामने खेळणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तरुण नेतृत्वाला घडवणे अत्यंत गरजेचे आहे. या बदलामुळे पुढील दोन वर्षांत संघाला योग्य दिशा मिळेल.
रोहितही या निर्णयाशी सहमत
गावसकरांनी स्पष्ट केले की, हा निर्णय रोहितच्या विरोधात नसून संघाच्या हितासाठी आहे. रोहितने देशासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. पण आता आपल्याला दोन वर्षांनी होणाऱया वर्ल्ड कपचा विचार करून संघ तयार करावा लागेल. या धोरणाशी रोहितही पूर्ण सहमत आहे, असे गावसकर म्हणाले.
आणखी कठोर निर्णय घेतले जातील
‘ही फक्त सुरुवात आहे. 2027 वर्ल्ड कप लक्षात ठेवून आणखी काही धक्कादायक निर्णय घेतले जातील. जे खेळाडू पुढील दोन वर्षांसाठी वनडे खेळण्याची तयारी दाखवू शकत नाहीत,
रोहितने देशांतर्गत क्रिकेट खेळावे
जर रोहितला पुढेही वनडे संघात खेळायचे असेल तर विजय हजारेसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळून सातत्य ठेवावे लागेल. पाच-सात वनडे सामने खेळून मोठा किताब जिंकता येत नाही. सततचा सराव आणि सामना अनुभव गरजेचा असल्याचे मत गावसकरांनी व्यक्त केले.
Comments are closed.