जम्मू -काश्मीरमध्ये पावसामुळे सतर्क

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टमुळे जम्मूच्या शालेय शिक्षण संचालनालयाने सोमवारप्रमाणेच मंगळवार, 7 ऑक्टोबरसाठी सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळाने 7 ऑक्टोबरपर्यंत वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झालेला दिसून येत आहेत. येथील पर्यटनावरही परिणाम झाला असून अनेक भागात पर्यटक अडकून पडले आहेत.

Comments are closed.