गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहि
Ind vs Wi 2 रा चाचणी: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी विजय मिळवला. आता 10 ऑक्टोबरला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पार्टीचे आयोजन केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा कसोटी सामना (Ind vs WI 2nd Test) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे घर देखील दिल्लीत आहे, म्हणून गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियातील खेळाडूंना त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित (Party In Gautam Gambhir) केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीपूर्वी होणाऱ्या या डिनर पार्टीसाठी सर्व खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्टीसाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिया संपूर्ण संघ जाणार आहे.
गौतम गंभीरच्या पार्टी कधी होणार? (Party In Gautam Gambhir House)
वृत्तानुसार, बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी अरुण जेटली स्टेडियममध्ये सराव सत्र पूर्ण केल्यानंतर, संपूर्ण संघ गौतम गंभीरच्या घरी जेवणासाठी जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघाने अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा मोठ्या प्रमाणात पराभव केला. दुसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली तरी टीम इंडिया मालिका जिंकेल.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरी कसोटी कधी आहे? (Ind vs WI 2nd Test Match)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी खेळली जाईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सकाळी 9.30 वाजता हा सामना सुरू होईल. याआधी या ठिकाणी 35 कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि गेल्या दोन वर्षांत येथे खेळली जाणारी ही पहिलीच कसोटी आहे. भारत आणि वेस्ट इंडिजने यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर सात वेळा कसोटी सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने टीम इंडियाला दोनदा पराभूत केले आहे, तर भारतीय संघाने फक्त एकदाच वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे. इतर चार सामने अनिर्णित राहिले आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (Team India Squad WI)
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद कृष्णा, कुलदीप यादव
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.