रोहित-कोहलीच्या भविष्याबाबत एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला! भारतीय चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma)आणि रोहित शर्मा यांना भारतीय टीममध्ये स्थान दिले गेले आहे. मात्र, रोहितच्या हाती असलेलं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद आता दुसऱ्या खेळाडूला दिली गेली आहे. शुबमन गिल कसोटीनंतर आता वनडे टीमचे नेतृत्व करताना दिसेल.
रोहितच्या कर्णधार पद काढून घेतल्यानंतर, त्याच्या आणि किंग कोहलीच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच, दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB Devilliers on Rohit & Virat) रोहित-कोहलीच्या भविष्याबाबत सनसनीखेज विधान केले आहे.
एबी डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले, आता याची हमी नाही की, कोहली आणि रोहित पुढच्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसतील. कदाचित निवडकर्ते सुद्धा तसेच विचार करत असतील, म्हणून शुबमन गिलला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गिल ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकतो. तो युवा आहे, उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि जबरदस्त लीडर देखील आहे.
कोहली आणि रोहित टीम इंडियाच्या जर्सीत शेवटच्या वेळी चँपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळले होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने 13 वर्षांचा खिताबी दुष्काळ संपवून ट्रॉफी जिंकली होती.
Comments are closed.