IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 8 सामने खेळणार, दोन्ही संघांचे सामने कधी व संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे (IND vs WI) . टीम इंडिया (Team india) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 सामने खेळणार असून यात 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांचा समावेश आहे. या दोन्ही मालिकांसाठी आधी भारताने आपला संघ जाहीर केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही टी20 आणि वनडे मालिकांसाठी आपला संघ जाहीर केला. चला तर जाणून घेऊया भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वनडे व टी20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक आणि सामन्यांच्या वेळा.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत. वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 25 ऑक्टोबरपर्यंत चालेल. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील. त्यानंतर 29 ऑक्टोबरपासून टी20 मालिका सुरू होईल, जी 8 नोव्हेंबरपर्यंत खेळली जाईल. या मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1:45 वाजता सुरू होतील.

आयएनडी वि ऑस एकदिवसीय मालिका

पहिला वनडे – 19 ऑक्टोबर, पर्थ

दुसरा वनडे – 23 ऑक्टोबर, अ‍ॅडलेड

तिसरा वनडे – 25 ऑक्टोबर, सिडनी

आयएनडी वि ऑस टी 20 मालिका

पहिला टी20 – 29 ऑक्टोबर, कॅनबेरा

दुसरा टी20 – 31 ऑक्टोबर, मेलबर्न

तिसरा टी20 – 2 नोव्हेंबर, होबार्ट

चौथा टी20 – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट

पाचवा टी20 – 8 नोव्हेंबर, ब्रिस्बेन

वनडे मालिकेसाठी भारताचा संघ

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल.

टी20 मालिकेसाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.

Comments are closed.