रणजी ट्रॉफीसाठी रोहित शर्माला संधी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघात सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. वनडे फॉरमॅटमध्ये आता रोहित शर्माला काढून शुबमन गिलला कर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात रोहित शर्मा दोन्ही फॉरमॅट मध्ये म्हणजेच टेस्ट आणि वनडेमधील कर्णधारपद गमावले आहेत. आता हिटमन फक्त सलामी बल्लेबाज म्हणून वनडेमध्ये खेळताना दिसणार आहे. दरम्यान, रणजी स्पर्धेसाठी संघांचीही घोषणा होऊ लागली आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीर संघाची घोषणा झाली असून, यात रोहित शर्माचे देखील नाव आहे.

रणजी ट्रॉफी 2025 साठी जम्मू-काश्मीर संघ जाहीर झाला तेव्हा त्यात रोहित शर्माचे नाव दिसले. जम्मू संघ आपला पहिला सामना मुंबईविरुद्ध खेळणार आहे, त्यामुळे रोहित शर्मा मैदानावर दिसू शकतो. हिटमॅनने टेस्ट क्रिकेटमधून आधीच निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे आश्चर्यकारक वाटेल. मात्र, आता या बातमी मधील सत्य समोर आले आहे. हा रोहित शर्मा भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज नाही. रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारा रोहित शर्मा जम्मू-काश्मीरचा एक गोलंदाज आहे, जो आपल्या गोलंदाजीने मैदानावर धुमाकुळ घालू शकतो. हिटमॅन विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना मात्र दिसू शकतो.

जम्मू-काश्मीरच्या खेळाडू रोहित शर्माचा जन्म 5 सप्टेंबर 1994 रोजी झाला. रोहितने 2015 मध्ये जम्मू-काश्मीरसाठी आपला डेब्यू केला, आणि त्यानंतरपासून तो सतत जम्मू-काश्मीरच्या संघासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. रोहित शर्माला साथ देण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या संघात आकिब नबी, उमर नजीर आणि उमरान मलिकही सामील आहेत. त्यामुळे या संघाची गोलंदाजी खूप मजबूत दिसत आहे. मागील वेळेस जम्मू-काश्मीरच्या संघाने मुंबईविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली होती.

Comments are closed.