महिलांनी आंघोळीवेळी ‘या’ भागावर साबण लावू नये, वाचा डॉक्टरांचा सल्ला

भारतामध्ये आजही बहुतांश लोक दररोज आंघोळीवेळी साबण वापरतात. विविध सुगंध, आकार आणि किंमतींमध्ये उपलब्ध असलेले साबण लोकांच्या दैनंदिन वापराचा भाग बनले आहेत. अनेक महिलांनी आता बॉडी वॉश वापरण्यास सुरुवात केली असली, तरी साबणाचा वापर अजूनही सर्वसामान्य आहे. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की शरीराच्या काही भागांवर साबण लावल्याने हानी होऊ शकते. विशेषतः महिलांनी आंघोळीच्या वेळी एका विशिष्ट भागावर साबण वापरणं टाळणं अत्यंत आवश्यक आहे. (why women should not use soap on private parts)

प्रायव्हेट पार्टवर साबण वापरणं टाळा

महिलांच्या शरीरात काही अतिसंवेदनशील भाग असतात ज्यांची स्वच्छता राखताना विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. त्यापैकी सर्वात संवेदनशील भाग म्हणजे वजाइना (खाजगी भाग). काही महिला स्वच्छतेसाठी आंघोळीच्या वेळी वजाइना साबणाने धुतात, परंतु हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

साबणात रसायनं आणि सुगंधी घटक असतात, जे त्या भागाच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे खाज, जळजळ, कोरडेपणा आणि संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

साबण लावल्याने काय नुकसान होतं?

वजाइना नैसर्गिकरित्या शरीरातील निरोगी बॅक्टेरियांच्या साहाय्याने स्वच्छ राहते. हे बॅक्टेरिया शरीराचं संरक्षण करतात आणि संसर्ग रोखतात. परंतु, जेव्हा आपण साबण वापरतो, तेव्हा हे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. परिणामी, वजाइना संसर्गाला अधिक संवेदनशील बनते आणि खाज, दाह किंवा दुर्गंधी निर्माण होऊ शकते.

मग स्वच्छता कशी राखावी?

वजाइना स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात उत्तम आणि सुरक्षित उपाय म्हणजे कोमट पाण्याचा वापर. पाण्याने बाह्य भाग स्वच्छ धुणं पुरेसं आहे. जर तुम्हाला एखादं उत्पादन वापरायचं असेल, तर बाजारात खास महिलांसाठी तयार केलेले ‘इंटिमेट वॉश’ उपलब्ध आहेत. मात्र, ती उत्पादने फक्त बाह्य भागावरच वापरा; अंतर्गत भागावर नाही.

मासिक पाळीच्या काळातही हीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्या काळात खाजगी भागावर जास्त रसायनं असलेली उत्पादने वापरल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.

शरीराच्या प्रत्येक भागाला स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असलं तरी, संवेदनशील भागांबाबत जागरूकता आणि सावधगिरी आवश्यक आहे. साबणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून बचाव करायचा असेल, तर नैसर्गिक आणि साध्या पद्धतींचाच अवलंब करा. नियमित स्वच्छता, योग्य कपडे आणि स्वच्छ सवयींनी शरीराचं आरोग्य सुरक्षित ठेवता येतं.

(टीप: वरील माहिती सर्वसामान्य आरोग्यविषयक माहितीनुसार दिलेली आहे. My Mahanagar याची पुष्टी करत नाही.

Comments are closed.