शिवसेनेचे आज राज्यव्यापी आंदोलन, जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर निदर्शने

अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयाला भरीव मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही सरकारकडून फसव्या घोषणा आणि आकडय़ांचा खेळ सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्या सकाळी 11 वाजता सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर आंदोलन व निदर्शने करण्यात येणार आहेत.

Comments are closed.