एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणारे 7 कर्णधार; यादीत 2 भारतीयांचा समावेश

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाचा आणखी एक दिग्गज माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांचाही टॉप 7 यादीत समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या या यादीत दोन माजी भारतीय कर्णधार, महेंद्रसिंग धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचाही समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज कर्णधार या विक्रमी यादीत समाविष्ट नाहीत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 230 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 165 सामन्यांमध्ये विजय मिळवला. पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दोनदा (2003 आणि 2007 ) एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 200 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी 110 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 178 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी 107 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 1987 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 138 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी 99 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 218 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले, त्यापैकी 98 सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप 7 कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ सहाव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 150 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 92 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या टॉप सात कर्णधारांच्या यादीत माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 174 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 90 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला.

Comments are closed.