नाशिकमध्ये एका दिवसात 3 खून! आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून पोरानं जीव घेतला, पोलिसांकडे कबुली


नाशिक गुन्हा: नाशिक शहरात खुनाच्या घटनांनी पुन्हा मोठी खळबळ उडणार आहे. केवळ एका दिवसात तब्बल तीन खुनांच्या घटना घडल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. यातील दोन खून हे कौटुंबिक कारणांमुळे झाल्याचं समोर आलं असून, एका प्रकरणात तर मुलानेच जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याने सगळ्यांनाच हादरा बसला आहे. (nashik crime)

काल पहाटे उपनगर परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीचा खून करण्यात आला. त्या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू असतानाच, सातपूर परिसरात दुपारी पुन्हा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या आईचा निर्घृण खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु या दोन घटनांनंतर शहरात पुन्हा रात्री उशिरा नाशिकरोड परिसरात आणखी एक हृदयद्रावक घटना घडली.

आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून खून

नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून, काल पहाटे उपनगर हद्दीत प्रॉपर्टी च्या वादातून एकाचा खून झाल्यानंतर सातपूरला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती, नशेत मुलाने आईचा निर्घृण खून केला होता मात्र ह्या घटनेला बारा तास देखील उलटत नाही तोच काल रात्री अकरा बाराच्या सुमारास नाशिकरोड शिवाजी नगर येथे वृद्ध महिलेला तिच्याच मुलाने गळा आवळून मारून टाकले, पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन आईच्या वृद्धापकाळाला कंटाळून आपण आईचा खून केल्याची कबुली दिली, या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तीनही घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका दिवसात सलग तीन खून त्यातही दोन कौटुंबिक कारणांमुळे घडल्याने ‘शहरात नेमकं चाललंय तरी काय?’ असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

कौटुंबिक तणाव आणि मानसिक ताणामुळे वाढलेले गुन्हे

तज्ज्ञांच्या मते, वाढता मानसिक ताण, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील तुटलेपणा आणि एकटेपणा ही अशी कारणं आहेत ज्यामुळे घराघरात वाद वाढत आहेत आणि त्याचं टोक खुनापर्यंत जात आहे. नाशिकसारख्या शांत शहरात एकाच दिवशी अशा तीन घटनांनी समाजातील नैतिक अध:पतनाचं प्रतिबिंब दिसून येत असल्याचंही बोललं जात आहे.

पोलिसांची चौकशी सुरू

सध्या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी सुरू असून, आरोपींच्या पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे. उपनगर, सातपूर आणि नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या सलग तीन खुनांच्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेलं आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

नाशिक गुन्हेगारी क्रमांक: नशिक शॉक बिहार? नऊ महिन्यांत, 45 खूनांच्या घटनेने, निरीक्षणाचे पालन पाच तास खाल्ले जाते; वर्डीचा धाकटा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.