Gold : तुम्ही खरेदी केलेले सोने खरे की खोटे? ओळखण्याचे सोपे मार्ग
दिवाळीची लगबग बाजारात दिसत आहे. दिवाळीला घरासाठी शोभेच्या वस्तू, नवीन कपडे या वस्तूंसोबत शुभशकून म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होते. दिवसेंदिवस सोन्याचे दर गगनाला भिडत असले तरी सोन्याची खरेदी करण्यात येते. अशा परिस्थितीत विविध ऑफर्स आणि माफक दरात मिळणाऱ्या जाहिराती पाहून खरेदी केले जातो, जे सोने अनेकदा नकली असते किंवा त्याला सोन्याचे पाणी दिलेले असते. अशा वेळी फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जाणून घेऊयात तुम्ही घातलेले सोने असली की नकली,
- देशात विकल्या जाणाऱ्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर BIS हॉलमार्क असतो. या छोट्याशा चिन्हावर BIS चे लोगो, सोन्याचे कॅरेट आणि ज्वेलरची ओळख असते. त्यामुळे दागिने खरेदी करताना त्यावर हे चिन्ह आहे का नाही ते पाहावे.
- शुद्ध सोने कधीही चुंबकाला आकर्षित होत नाही. जर तुम्ही खरेदी केलेले दागिने चुंबकाकडे खेचले जात असतील तर त्यात इतर धातुंची भेसळ आहे हे लक्षात घ्यावे.
हेही वाचा – हॉटेलमध्ये राहताना ‘या’ फ्लोरवरील रूम कधीच घेऊ नका, जाणून घ्या याचं कारण
- असली नकली सोन्याची पारख करण्यासाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात दागिने टाका. खरे सोने लगेच तळाशी जाईल तर खोटं सोने किंवा सोन्याची पॉलिश असेल तर ते दागिने तरंगतील.
- दागिने काही वेळ वापरा आणि त्वचेवर लक्ष द्या. खऱ्या सोन्यामुळे त्वचेचा रंग बदलत नाही. पण जर त्वचेवर हिरवट, काळसर डाग पडले किंवा खाज सुटली, तर ते सोने नकली असण्याची शक्यता आहे.
- जर तुम्हाला सोन्याची पारख नसेल तर नेहमी विश्वासार्ह दुकानातून सोने खरेदी करावे. याशिवाय मोठमोठ्या शोरूम्सवरही विश्वास ठेवता येतो, कारण ते तुम्हाला सोने अस्सल आहे की नाही यासंबंधीची सर्व आवश्यक कागदपत्रे देतात.
हेही पाहा – दारूमध्ये कोला किंवा सोडा मिक्स करताय? होऊ शकतो हृदयावर ‘अटॅक’
Comments are closed.