मला त्याची काळजी वाटते, थोडे प्रयत्न केले असते तर रिलेशन वाचलं असतं का? धनश्री काय म्हणाली?


युझवेंद्र चहलवरील धनाश्री वर्मा: प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या चर्चेत आहे. ती अश्नीर ग्रोव्हरच्या ‘राईज अँड फॉल’ (Rise And Fall  Show) या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोमध्ये ती तिच्या आणि युजवेंद्र चहल सोबतच्या (Yuzvendra Chahal) नात्याबाबत आणि नंतर झालेल्या घटस्फोटाबाबत (Divorced) अनेक खुलासे करत आहे. नुकताच धनश्री शोमध्ये स्पर्धक अर्जुन बिजलानीसोबत तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला.  त्यावेळी तिनं अजुनही युजवेंद्रबद्दल काळजी वाटत असल्याचंही म्हटलंय, यावेळी धनश्रीच्या डोळ्यांत अश्रू तराळले होते.

‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अर्जुन बिजलानी स्पर्धक धनश्री वर्माला विचारतो की, तिचं लव्ह मॅरेज होतं की, अरेंज्ड मॅरेज. धनश्री उत्तर देते की, “लव्ह आणि अरेंज्ड मॅरेज दोन्हीही… खरंतर सुरुवात अरेंज्ड मॅरेजपासून झाली होती, म्हणून त्याला डेटिंग न करता लग्न करायचं होतं…  माझा कोणताही प्लॅन नव्हता…” अर्जुन बिजलानी पुढे म्हणाला, “मी त्याला प्रत्यक्ष भेटलोय. तो एक चांगला माणूस दिसतो आणि जास्त बोलत नाही… पण तुमच्या घटस्फोटाला किंवा भांडणासाठी दुसरं कुणी जबाबदार नव्हतं ना? नाही का?”

अर्जुन बिजलानीच्या प्रश्नावर धनश्री म्हणाली की, “आपण याबद्दल नंतर बोलू…” त्यानंतर अभिनेत्यानं विचारलं की, “तुम्हाला वाटते का की, तुम्ही दोघे कधी मित्र होऊ शकाल?” यावर धनश्रीनं उत्तर दिलं, “मला नेहमीच त्याची काळजी असेल, मी एवढेच म्हणू शकते. ही काळजी माझ्याकडून कधीही संपणार नाही…” धनश्री आणि अर्जुनमधल्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, धनश्रीच्या बोलण्यावरुन तिला अजूनही युजवेंद्र चहलची काळजी आहे, असा अंदाज बांधत आहेत.

धनश्रीला मिळालाय ‘गोल्डडिगर’चा टॅग

अर्जुन व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो की, “मला माहीत नाही, कारण जर मी इतक्या काळापासून एखाद्या महिलेसोबत आहे, तर मला वाटतं की, नातं जपण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील. जरी, मला खात्री आहे की, प्रत्येकाची स्वतःची कारणं असतील…” यावर धनश्री हसली आणि भावूक झाली. त्यानंतर अर्जुन बिजलानीनं तिला मिठी मारली. धनश्रीनं पुन्हा सांगितलं की, तिनं नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झालं नाही.

दरम्यान, 2020 मध्ये लग्न झालेल्या धनश्री आणि युजवेंद्र यांनी या वर्षी मार्चमध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला. यानंतर, अनेकांनी धनश्रीवर टीका केली आणि तिला ‘गोल्डडिगर’ देखील म्हटलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: ‘तिचं घर माझ्यामुळे चालतंय म्हणून…’; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहलकडून एक घाव दोन तुकडे

आणखी वाचा

Comments are closed.