कही खुशी- कही गम… रत्नागिरी नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहिर
रत्नागिरी नगरपरिषदेच्या १६ प्रभातील ३२ जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.प्रभाग क्रमांक ९ अ हि अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात आज प्रांताधिकारी जीवन देसाई आणि मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत हि सोडत काढण्यात आली.चिठ्ठ्या टाकून हि आरक्षण सोडत काढण्यात आली.आपल्याला अपेक्षित असलेले आरक्षण पडल्याने काहींना आनंद झाला तर निवडणुकीची तयारी करूनही अपेक्षित आरक्षण न पडल्याने काही मंडळी नाराज झाली.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्र.१ अ- सर्वसाधारण महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.अ-सर्वसाधारण महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.३ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.४ अ- सर्वसाधारण महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.५ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग,ब- सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.६ अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग ,ब- सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.७ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग,ब- सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.८ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.९ अनूसुचित जाती, ब- सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.१० अ- सर्वसाधारण महिला,ब-सर्वसाधारण,प्रभाग क्र.११ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग,ब- सर्वसाधारण महिला,प्रभाग क्र.१२ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.१३ अ- सर्वसाधारण महिला,ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र.१४ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,ब- सर्वसाधारण, प्रभाग क्र.१५ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,ब- सर्वसाधारण,प्रभाग क्र.१६ अ- सर्वसाधारण महिला,ब- सर्वसाधारण
Comments are closed.