विराट-रोहित शिवाय देखील टीम इंडिया मजबूत! भारत दौऱ्यापूर्वी टेम्बा बावुमाचं मोठं वक्तव्य

कसोटी क्रिकेटमध्ये सतत चांगली कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ आता भारत आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. आशियात मोठे विजय नोंदवून, आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आपली ओळख अधिक दृढ करू इच्छितो. त्यासाठी त्याने भारतविरुद्ध मालिकेची तयारी आधीच सुरू केली आहे.

या दरम्यान, CEAT पुरस्कार समारंभात टेम्बा बावुमाने रोहित-विराट शिवाय खेळणाऱ्या भारतीय टीमबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध मालिकेबाबतही त्याने विचार मांडला.

CEAT पुरस्कार समारंभात भारतीय संघाविरुद्ध मालिकेबाबत विचारल्यावर टेम्बा बावुमाने म्हटले, “असं वाटतं आहे की क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. रोहित आणि कोहली (South Africa Captain on Virat Kohli and Rohit Sharma) यांनी आपलं काम अप्रतिम पद्धतीने केलं. त्यांनी टीम इंडियाला खूप मजबूत बनवलं. त्यामुळे त्यांशिवायही टीमशी सामना करताना थोडा दबाव येतो.

मला वाटतं की, टीम इंडिया आपले मैदानावर प्रभुत्व मिळवेल, पण आपल्याला त्यांना पूर्णपणे प्रभुत्व गाजवू द्यायचे नाही. टीम इंडियाला आता नवीन कर्णधार मिळाला आहे आणि मी स्वतः भारतात कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून खेळणार आहे. याबद्दल अनेक छोटी-छोटी गोष्टी आहेत ज्या खेळाला अधिक सुंदर बनवतात.

गेल्या 10 वर्षांत भारताने फक्त 1 कसोटी मालिका गमावली आहे, ती 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध. याबाबत बोलताना त्याने म्हटले, भारतामधील खेळपट्टी, दबाव आणि हवामान वेगळे असते. केनने ज्या प्रकारे आपल्या टीमला यश मिळवून दिलं, ते कौतुकास्पद आहे. त्याच्याकडून शिकण्याची संधी आहे. पाकिस्तानमध्ये चांगला खेळ करून आपण भारतासाठी तयार होऊ इच्छितो. हे आपल्या खेळाडूंसाठी या परिस्थितीत चांगला सराव ठरेल.

Comments are closed.