गंभीर-सूर्यकुमारचा पूर्ण पाठिंबा, 3 वर्षांनी संघात परतलेल्या भारतीय गोलंदाजांचा खुलासा! जाणून घ्या काय म्हणाला

मंगळवारी झालेल्या CEAT अवॉर्ड्समध्ये अनेक भारतीय क्रिकेटर उपस्थित होते. या कार्यक्रमात भारताचा स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीही (Varun chakrawarthy) उपस्थित होता. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनसह अनेक टॉप खेळाडू येथे होते. विशेष करून वरुण चक्रवर्तीची चर्चा होती, कारण तो 2025 मध्ये भारतासाठी सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.

वरुणने आशिया कपमध्ये 6 सामन्यांत फक्त 7 विकेट्स घेतल्या, पण याआधीच्या मालिका आणि स्पर्धेत त्याने जोरदार कामगिरी करून 11 सामन्यांत 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो 2025 मध्ये सर्वाधिक टी20 विकेट्स गोलंदाज ठरला आहे.

खरं म्हणजे वरुणच्या पुनरागमनाची गोष्ट खूपच रोचक आहे. 2021 टी20 वर्ल्ड कपनंतर तो भारतीय संघातून बाहेर झाला होता, पण सुमारे 3 वर्षांनी त्याने संघात जोरदार पुनरागमन केले. त्याने आता सांगितले की, परतल्यानंतर कोच गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir & captain Suryakumar Yadav) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्यांच्याबद्दल काय म्हटले.

CEAT क्रिकेट अवॉर्ड्समध्ये वरुण चक्रवर्ती म्हणाला, मी परतलो तेव्हा सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर यांनी सांगितले की, ते मला भारतीय संघात विकेट घेणारा गोलंदाज म्हणून पाहत आहेत. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. मला त्यांना श्रेय द्यायचं आहे, कारण मी 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ संघाबाहेर होतो. मी IPL मध्ये सतत चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्यांनी माझं कौशल्य ओळखून मला संघात परत आणणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.

गौतम गंभीर कोच झाल्यानंतर वरुणला टी20 संघात परत आणले गेले. परतल्यानंतर त्याने संघासाठी 18 टी20 सामने खेळले आहेत आणि 38 विकेट्स घेतल्या आहेत. हे आकडे दाखवतात की, तो कर्णधार आणि कोचच्या विश्वासावर पूर्ण खरा उतरला.

Comments are closed.