रोहित शर्माची झकास टेस्ला राईड; फ्रंट सीटवर बसून दिला स्टाईलिश एंट्री, VIDEO!
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज रोहित शर्मा सध्या त्याच्या नव्या टेस्ला कारमुळे चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने आपली जुनी कार एका तरुणाला भेट दिल्याचं वृत्त व्हायरल झालं होतं. त्यावेळी रोहितच्या या उदारतेचं समाजमाध्यमांवर (Social Media) मोठं कौतुक झालं होतं. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आहे, पण यावेळी कारण आहे त्याने खरेदी केलेली नवी कोरी टेस्ला आणि तिच्या नंबरप्लेटमागची भावनिक गोष्ट.
रोहितने सध्या घेतलेल्या टेस्ला कारचा नंबर आहे MH01FB3015. पाहता पाहता या गाडीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रोहित काळा टी-शर्ट आणि टोपी घालून ही स्टायलिश गाडी चालवत आहे. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधलं ते या गाडीच्या नंबरप्लेटनं. कारण, या नंबरप्लेटवरील शेवटचे चार अंक – 3015 केवळ आकडे नाहीत, तर रोहितच्या कुटुंबाशी जोडलेलं एक खास नातं आहेत.
रोहित शर्माने एक नवीन टेस्ला इलेक्ट्रिक कार विकत घेतली आहे आणि त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच त्याने आपल्या मुलांच्या जन्म तारखांच्या आधारे त्याची संख्या निवडली आहे. 🥹❤
3015 🤍 pic.twitter.com/tqbaia4rkq
– 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiiii_12) 7 ऑक्टोबर 2025
या आकड्यांची वेगळी फोड केली, तर लक्षात येतं की 30 आणि 15 हे दोन अंक थेट रोहितच्या मुलांच्या जन्मतारखेशी संबंधित आहेत. रोहितने डिसेंबर 2015 मध्ये रितिका सोबत विवाह केला होता. त्यानंतर, 30 डिसेंबर 2018 रोजी त्यांच्या घरी कन्यारत्न समायराचा जन्म झाला. यानंतर, 15 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या दुसऱ्या अपत्याचा एका गोंडस मुलाचा – जन्म झाला. त्यामुळे, टेस्लाच्या नंबरप्लेटवरील 3015 हे रोहितच्या दोन्ही मुलांचे खास आणि प्रेमाचे प्रतिनिधित्व करणारे अंक आहेत.
एकीकडे रोहित टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया या दौऱ्यात सहभाग घेणार असून, रोहितनेही ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळणं हे नेहमीच एक मोठं आव्हान असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच त्याच्या टेस्ला कारमागची ही भावनिक आणि खास गोष्ट सर्वांच्या मनाला भिडत आहे.
Comments are closed.