आशिया कपमध्ये ट्रॉफी न मिळाल्यानंतरही सेलिब्रेशन करण्याचा या खेळाडूने सूर्याला दिला सल्ला! मोठा खुलासा समोर
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवला (IND vs PAK Asia Cup Final). टीम इंडियाने आधीच ठरवले होते की, त्यांनी PCB प्रमुख मोहसिन नक्वीकडून (Mohsin Naqvi) ट्रॉफी स्वीकारणार नाही. नक्वी कप स्वतः बरोबर घेऊन गेले आणि आतापर्यंत टीम इंडियाला ट्रॉफी मिळालेली नाही. तरीही भारतीय टीमने ट्रॉफी न मिळाल्यानंतरही आनंद साजरा केला. टीम इंडियाचे खेळाडू असे दर्शवू इच्छित होते की, त्यांच्याकडे ट्रॉफी नाही, पण त्याशिवायही त्यांनी आनंद साजरा केला. आता हे समोर आले आहे की, ट्रॉफीशिवाय आनंद साजरा करण्याचा सल्ला कोणी दिला होता.
वरुण चक्रवर्तीने (Varun chakrawarthy) अलीकडे एका शोमध्ये सांगितले की, त्याने ट्रॉफीची वाट पाहिली, पण ती मिळाली नाही. तरीही टीमने आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला कारण हा एक मोठा क्षण होता. वरुणने सांगितले की, अर्शदीप सिंगने (Arshdeep singh Suggest Suryakumar Yadav) सूर्यकुमार यादवला सुचवले की, फायनलमध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद ट्रॉफीशिवायही साजरा करता येईल. यामुळेच आपल्याला आयकॉनिक सेलिब्रेशन पाहायला मिळाले आणि ते संपूर्ण जगात व्हायरल झाले.
Comments are closed.