युवा हिंदुस्थानने केली कांगारूंची कत्तल; दोन सामन्यांच्या मालिकेत मिळविले निर्भेळ यश, कसोटी दोनच दिवसांत जिंकली
हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील युवा संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यजमान कांगारूंची अक्षरशः कत्तल केली असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही. कारण पहिल्या कसोटीत अडीच दिवसांतच ऑस्ट्रेलियन युवा संघाचा खेळ खल्लास करणाऱ्या युवा हिंदुस्थानने चार दिवसांची दुसरी कसोटीही अवघ्या दोनच दिवसांत जिंकून यजमान संघावर निर्विवाद वर्चस्व गाजविले. हिंदुस्थानने या मालिकेत 2-0 फरकाने बाजी मारत निर्भेळ यश संपादन केले. तसेच याआधी झालेली एकदिकसीय मालिकाही हिंदुस्थानच्या युवा 3-0 फरकाने जिंकली होती.
ब्रिस्बेनमधील पहिल्या कसोटीत हिंदुस्थानच्या युवा संघाने यजमानांना डाकाने आणि 58 धावांनी धूळ चारली होती. मॅकेमधील दुसऱ्या कसोटीत मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा पूर्णपणे ऱहास झाला. त्यांना पहिल्या डावात 135, तर दुसऱ्या डावात जेमतेम 116 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ऍलेक्स ली यंग (66 क 38) याने काही प्रमाणात हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला, पण इतर फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या डावात 171 धावा करणाऱ्या हिंदुस्थानने विजयासाठी मिळालेले 81 धावांचे लक्ष्य 12.2 षटकांत 3 बाद 84 धावा करीत सहज पूर्ण करीत 7 गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या डाकात हिंदुस्थानला आघाडी
पहिल्या डाकात ऑस्ट्रेलिया 135 धावांत गारद झाला. यंगने केलेल्या 66 धावांशिकाय बाकी सर्क फलंदाज अपयशी ठरले. हिंदुस्थानकडून हेनिल पटेल व खिलन पटेल यांनी तीन-तीन बळी टिपले. प्रत्युत्तरात हिंदुस्थानी संघाने 171 धाका करत पहिल्या डावात 36 धावांची आघाडी घेतली. हेनिल पटेल (22) आणि दीपेश देकेंद्रन यांची जोडी आज सकाळी लककर तुटली; पण देकेंद्रनने 28 धाका करून हिंदुस्थानला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून केसी बार्टनने 4 फलंदाज बाद केले.
तरुण हिंदुस्थानचा सुलभ विजय
n हिंदुस्थानच्या युवा संघासमोर विजयासाठी 81 धावांचे लक्ष्य होते. प्रारंभी कैभक सूर्यकंशी पहिल्याच चेंडूकर शून्याकर बाद झाला, तर कर्णधार आयुष म्हात्रे (13) देखील लककर बाद झाला, मात्र किहान मल्होत्रा (21) आणि केदांत त्रिकेदी (33 नाबाद) यांनी जलद भागीदारी करत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. राहुल कुमार (13 नाबाद) सोबत त्रिकेदीने 12.2 षटकांत विजयी लक्ष्य गाठले आणि हिंदुस्थानला मालिका विजय मिळकून दिला.
हिंदुस्थानचे गोलंदाज ठरले लवाद
n हिंदुस्थानकडून हेनिल पटेलने दुसऱ्या कसोटीत सर्वाधिक 6 बळी टिपले. उदक मोहनने 4, तर फिरकीपटू खिलन पटेल आणि नामन पुष्पक यांनी मिळून 7 फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून बार्टन सर्कात प्रभावी ठरला, त्याने एकूण 6 बळी घेतले, पण संघाला विजय मिळकून देण्यात त्याला यश आले नाही.
Comments are closed.