कुस्तीपटू अमन सहरावतवर वर्षभराची बंदी!

हिंदुस्थानी कुस्तीपटू आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अमन सहरावत याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान वजन जास्त भरल्याने राष्ट्रीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) त्याच्यावर ही कारवाई केली आहे. 22 वर्षीय अमन सहरावत 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान क्रोएशियामध्ये झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 57 किलो ‘प्री स्टाईल’ गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार होता. मात्र, त्याचे वजन 1.7 किलो जास्त भरल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाद करण्यात आले.23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कुस्ती महासंघाने अमनला ‘कारणे दाखला’ नोटीस बजाविली आणि 29 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागविले होते. अमनने उत्तर दिले; परंतु फेडरेशनच्या शिस्तपालन समितीला ते समाधानकारक वाटले नाही. परिणामी, त्याच्यावर ‘डब्ल्यूएफआय’ने एका वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.