बदलापूर एन्काऊंटर पोलिसांना क्लीन चिट

बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायालयीन आयोगाने आज पोलिसांना ‘क्लीन चिट’ दिली. या प्रकरणाच्या चौकशीकरिता न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचा दावा आयोगाने मान्य केला आहे.
ठाणे जिह्यातील बदलापूरच्या एका शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर सफाई कामगार असलेल्या आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर परिसरात जनक्षोभ उसळला होता.
आरोपी नेण्याच्या प्रक्रियेवर मात्र सवाल
न्यायालयीन आयोगाने पोलिसांना गोळीबार प्रकरणात क्लीन चिट दिली असली तरी आरोपी अक्षय शिंदेला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर मात्र सवाल उपस्थित केले आहेत.
Comments are closed.