भारतीय रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर रिलीझ

डीआरडीओची कामगिरी : संरक्षण क्षेत्रात भारताचे मोठे यश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सशस्त्र दलांदरम्यान आधुनिक आणि सुरक्षित संचारप्रणाली सुनिश्चित होण्यासोबत आंतर-संचालन क्षमता किंवा ताळमेळ प्रभावी होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओने) ‘इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर’ (आयआयएसए) जारी केला आहे. संरक्षण मंत्रालयानुसार ही भारताची संरक्षण संचार तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठी कामगिरी आहे. आयआरएसए व्यापक सॉफ्टवेअर आर्किटेक्चर मानक असून त्याला ‘सॉफ्टवेकर डिफाइंड रेडिओ’ (एसडीआर) तंत्रज्ञानासाठी विकसित करण्यात आले आहे.

तिन्ही दलांचे मिळाले सहकार्य

डीआरडीओने इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ (आयडीएस) आणि तिन्ही दलांच्या (भूदल, नौदल आणि वायुदल) सहकार्येने आयआरएसए जारी केले आहे. यात समान इंटरफेस, एपीआय वेवफॉर्म पोर्टेबिलिटी सामील आहे. याचा उद्देsश भारतीय सशस्त्र दलांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध एसडीआर प्लॅटफॉर्म्समध्ये एकरुपता, प्रमाणन आणि अनुपालन सुनिश्चित करणे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे.

आयआरएसएला मंजुरी

आयआरएसए पुढाकाराची सुरुवात 2021 मध्ये झाली, तेव्हा आधुनिक सैन्य संचारात एसडीआरच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला होता आणि एका राष्ट्रीय सॉफ्टवेअर मानकाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. डीआरडीओच्या नेतृत्वात तांत्रिक टीमने 2022 मध्ये कार्य सुरू केले, संबंधित घटकांसोबत समीक्षा आणि विचारविनिमयानंतर आयआरएसए वर्जन 1.0 ला मंजुरी देण्यात आली.

Comments are closed.