मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलेल्या सौमेन सेन
शिलाँग
- न्यायाधीश सौमेन सेन यांनी बुधवारी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.एच. विजयशंकर यांनी सेन यांना राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित एका सोहळ्यात पदाची शपथ दिली. सौमेन सेन हे न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांचे स्थान घेणार आहेत. बॅनर्जी 5 सप्टेंबर रोजी निवृत्त झाले होते. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 26 सप्टेंबर रोजी न्यायाधीश सेन यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती.
Comments are closed.