आरेमधून थेट कफ परेडपर्यंत मेट्रो, आजपासून संपूर्ण भुयारी मार्गिकेवर प्रवासी वाहतूक

भुयारी मेट्रो मार्गिकेच्या वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेडदरम्यानच्या अंतिम टप्प्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यामुळे आता पश्चिम उपनगरातील आरे स्थानकातून थेट कफ परेडपर्यंत मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. गुरुवारपासून या संपूर्ण भुयारी मार्गिकेवर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. 33.5 किमी लांबीची ही ‘अॅक्वा लाईन’ मुंबईचा अंतर्गत प्रवास वेगवान बनवणार असल्याचे बोलले जात आहे.

उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणे तसेच रस्त्यांवरील वाहनांची संख्या नियंत्रणात आणणे ही उद्दिष्टे डोळय़ापुढे ठेवून भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम केले आहे. या प्रकल्पांतर्गत बीकेसी ते वरळी आचार्य अत्रे चौकपर्यंतचा दुसरा टप्पा मे महिन्यात खुला केला होता. त्यानंतर अंतिम टप्प्याच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लागली होती. अखेर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 11.2 किमी लांबीच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेमुळे नरिमन पॉइंट, कफ परेड, पर्ह्ट, लोअर परेल, बीकेसी आणि सीप्झ/एमआयडीसी ही सहा व्यावसायिक पेंद्रे परस्परांना जोडली जाणार आहेत. तसेच काळबादेवी, गिरगाव, वरळी यांसारखा परिसराची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळाशी ‘कनेक्टिव्हिटी’ सुलभ होणार आहे. गिरगाव, काळबादेवी भागात मेट्रो सेवा सुरू झाल्याने दक्षिण मुंबईतील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दक्षिण मुंबईतील ही पहिलीच मेट्रो सेवा असल्याने स्थानिक नागरिकांची भुयारी मेट्रोतून प्रवासाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'मुंबई वन अॅप'चे उद्घाटन

गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले 'मुंबई वन अॅप' अखेर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले? हे अॅप मुंबई मेट्रोपॉलिटन प्रदेशातील तब्बल 11 सार्वजनिक वाहतूक प्रणालींना एकत्र आणणारे देशातील द्वारा सामान्य गतिशीलता प्लॅटफॉर्म आहे? मुंबई महानगरातील प्रवास सुलभ करण्यासाठी हे अॅप डिझाइन केले आहे? मुंबईकरांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म आणि क्यूआर कोडचा वापर करून प्रवासाचे नियोजन आणि बुकिंग करते येणार आहे? 'मुंबई वन अॅप' मुंबई मेट्रो, स्थानिक ट्रेन आणि मोनोरेलपासून शहर उपनगरांतील बसेसपर्यंत सर्व प्रवासी सुविधांचा लाभ घेण्यास सोयिस्कर ठारणार आहे?

मुंबईत आज ग्लोबल फिनटेक फेस्ट

मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर होणारा ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांचा पहिला हिंदुस्थान दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. स्टार्मर हे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुंबईतील ’ग्लोबल फिनटेक फेस्ट’मध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये ’इंडिया-यूके व्हिजन 2035’वर निर्णायक चर्चा होणार आहे. दोन्ही देशांसाठी ही नव्या युगाची सुरुवात ठरेल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क खात्याचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.

Comments are closed.