टीम इंडियानं नाकारलेल्या मोहम्मद शमीने घेतला महत्त्वाचा निर्णय, आता 'या' संघाकडून खेळणार!

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. त्याला भारताच्या कसोटी, वनडे आणि टी20 तिन्ही संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, आता त्याला 2025-26 रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने बुधवारी रणजी हंगामासाठी आपला संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे देण्यात आले आहे, जो भारताच्या कसोटी संघात पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहे. उपकर्णधार म्हणून विकेटकीपर-फलंदाज अभिषेक पोरेलची निवड करण्यात आली आहे.

शमीसोबत टीम इंडियाचा आणखी एक वेगवान गोलंदाज आकाश दीपही या संघात आहे. दोघे मिळून बंगालच्या गोलंदाजी विभागाची धुरा सांभाळतील. फलंदाजीची जबाबदारी अभिमन्यू ईश्वरन, अभिषेक पोरेल, अनुस्तूप मजूमदार, सुदीप चटर्जी आणि सुदीप कुमार घरामी यांच्यावर असेल. तर युवा खेळाडू राहुल प्रसाद, सौरभ कुमार सिंह आणि विशाल भाटी मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत.

बंगाल संघाचा पहिला सामना 15 ऑक्टोबर रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे उत्तराखंडविरुद्ध होईल. त्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी दुसरा सामना गुजरातविरुद्ध खेळवला जाईल. या हंगामात दमदार कामगिरी करत शमी पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.

या संघाचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला आहेत. सहाय्यक प्रशिक्षक अरूप भट्टाचार्य आणि शिब शंकर पॉल, तर फील्डिंग कोच चरणजीत सिंह मथारू आहेत.

भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ज्यामधील दुसरा उद्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला.

Comments are closed.