टीम इंडिया बसमधून आली, पण संघात नसताना गंभीरच्या लाडक्याची प्रायव्हेट कारमधून पार्टीत हजेरी
गौतम गंभीर डिनर पार्टी: वेस्ट इंडिजविरुद्ध 10 ऑक्टोबरपासून (India vs West Indies 2nd Test ) सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या घरी खास डिनर पार्टीचे आयोजन केले. दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळवला जाणार असल्याने, जिथे गंभीर यांचे घर आहे, तिथेच 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता ही पार्टी ठेवण्यात आली होती. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफचे सर्व सदस्य बसने गंभीर यांच्या घरी आले होते.
हर्षित राणाची खास एन्ट्री (Harshit Rana Attends Gautam Gambhir Dinner Party Video)
या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हर्षित राणाने (Harshit Rana News). तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतानाही गंभीर यांच्या घरी पोहोचला. हर्षित राणाला अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले असून, त्यावर बरीच चर्चा रंगली होत की तो गौतम गंभीरचा लाडका आहे.
हरशीट राणा संघाच्या डिनरसाठी प्रशिक्षक गौतम गार्शीरच्या घरी खास कारमध्ये स्वतंत्रपणे आला. pic.twitter.com/ucse2nql1a
– 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiiii_12) 8 ऑक्टोबर, 2025
टीम इंडिया बसमधून आली अन् हर्षित राणाची कारमधून ऐटीत एन्ट्री
विशेष म्हणजे, उर्वरित भारतीय खेळाडू टीम बसने गौतम गंभीरच्या घरी पोहोचले, तर हर्षित राणा वेगळ्या खाजगी वाहनाने पोहोचला. तो गौतम गंभीरच्या घरी त्याच्या स्वतःच्या गाडीने जेवणासाठी पोहोचला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत हर्षित राणा टीम इंडियाचा भाग नसला तरी, गंभीरप्रमाणे तोही दिल्लीत राहतो. गंभीरने त्याला आमंत्रित करण्याचे हे एक कारण असू शकते, अशी चर्चा आहे.
#वॉच | भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघ आणि सहाय्यक कर्मचारी दिल्लीत संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गार्बीर यांच्या निवासस्थानी पोहोचले
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या आणि अंतिम कसोटीपूर्वी त्यांनी त्यांच्यासाठी खास डिनर आयोजित केला आहे, जो 10 ऑक्टोबरपासून अरुण जेटली येथे सुरू होईल… pic.twitter.com/qfhsgroqdo
– वर्षे (@अनी) 8 ऑक्टोबर, 2025
कोण कोण आले होते पार्टीला? (Who came to Gautam Gambhir Dinner Party?)
गौतम गंभीर यांच्या या डिनर पार्टीला टीम इंडियाचे सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेही या संध्याकाळी सामील झाले होते. सर्व खेळाडू साध्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसले, मात्र शुभमन गिलने मात्र ‘अमीरी’ ब्रँडची वेगळी रंगाची टी-शर्ट परिधान केला होता. गंभीर यांनी टीमसाठी कोणता खास मेन्यू ठेवला होता, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र खेळाडूंनी डिनर करताच सर्वजण पुन्हा टीम बसने परत हॉटेलकडे रवाना झाले.
#वॉच | बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला दिल्लीतील संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गार्बीर यांच्या निवासस्थानी आले
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या आणि अंतिम कसोटीपूर्वी गौतम गार्बीर यांनी भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघासाठी आणि सहाय्यक कर्मचार्यांसाठी विशेष डिनर आयोजित केले आहे,… https://t.co/rzx5li0cq0 pic.twitter.com/od8pbpiwow
– वर्षे (@अनी) 8 ऑक्टोबर, 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.