तुम्हीही बेड-टी घेताय सावधान! रिकाम्या पोटी चहा घेणं धोक्याचं

भारतीय संस्कृतीत चहाचं एक वेगळंच स्थान आहे. दिवसाची सुरुवात बहुतेकांच्या हातातल्या चहाच्या कपानेच होते. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी हळूहळू हानिकारक ठरू शकते? अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायची सवय असते, ज्याला आपण “बेड-टी” म्हणतो. मात्र, रिकाम्या पोटी चहा पिणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. (bed tea side effects empty stomach tea health risk)

रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटातील ॲसिडिटी वाढते, पचनशक्ती कमी होते आणि शरीरातील पोषक घटक शोषण्याची क्षमता बिघडते. ही सवय दीर्घकाळ सुरू राहिल्यास अनेक आरोग्यसमस्या उद्भवू शकतात.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे गंभीर तोटे :

1. पचनसंस्थेवर वाईट परिणाम:
रिकाम्या पोटी चहामधील कॅफिन पोटातील ॲसिड वाढवतं. त्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात.

2. लोहाची कमतरता आणि ॲनिमियाचा धोका:
चहामधील टॅनिन हे घटक शरीरात लोह शोषण्यास अडथळा निर्माण करतात. त्यामुळे दीर्घकाळात ॲनिमिया आणि थकवा जाणवतो.

3. डिहायड्रेशनचा त्रास:
कॅफिनमध्ये मूत्रवर्धक गुणधर्म असल्यामुळे शरीरातून पाणी बाहेर टाकलं जातं. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

4. हार्मोन्सचे असंतुलन:
सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्यास शरीरातील तणाव हार्मोन्स वाढतात. यामुळे मूड स्विंग्स, झोप न येणे आणि मानसिक थकवा येऊ शकतो.

5. दात आणि हाडांवर परिणाम:
जास्त प्रमाणात आणि उपाशीपोटी चहा घेतल्याने दातांवर डाग पडतात आणि कॅल्शियमची कमतरता होऊन हाडं कमजोर होतात.

6. भूक कमी होणे:
सकाळी चहा घेतल्याने भूक कमी होते आणि त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. परिणामी पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

चहा बंद करण्याची गरज नाही?
डायटीशियन डॉक्टर प्रणिता अशोक यांच्या मते, गरज चहा बंद करण्याची नाहीये चहाची क्वान्टिटी कमी करण्याची आहे लोक काही काही वेळेला दिवसातून सहा सात आठ आठ वेळेला चहा घेतात मी म्हणते तो दोनदा घ्या आपल्याला सकाळी चहाची गरज असते एक चार वाजता लागतो फक्त आपल्याला त्याच्या मधला जो काही प्रकार आहे हा बंद केला तर त्या चहाचे तोटे नाही आहेत उलट आपल्याला थोडं रिफ्रेश होण्यासाठी दिवस चालू झाला की छान वाटतं. पण त्याला मर्यादा पाहिजे दोन वेळा घ्या चालेल पण सतत घेतल्याने तोटे आहेतच. सकाळी उठल्याबरोबर चहाऐवजी कोमट पाणी किंवा लिंबूपाणी घ्या. नंतर न्याहारीनंतर एक कप चहा घेणं योग्य ठरेल. दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा चहा घेणं पुरेसं आहे.

https://www.youtube.com/watch?v=gc59hhl7xxq

चहा हा ऊर्जादायक आणि आनंददायी पेय आहे, पण त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे चहाला दोष नाही, दोष आहे आपली चुकीची वेळ आणि सवय.

Comments are closed.