जामसंडेत 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

सिंधूदूर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे बाजारपेठयेथील अनिकेत लाड यांच्या किराणा दुकानावर छापा टाकून 38 हजार रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई बुधवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.25 वा.सुमारास केली.या कारवाईमुळे गुटखा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी 5.25 वा.सुमारास जामसंडे बाजारपेठ येथील अनिकेत रामचंद्र लाड(25) यांच्या दुकानाच्या मागील बाजुस साठा करून ठेवलेल्या गुटख्यावर छापा टाकला. तेथून सुमारे 37 हजार 844 रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये विमल पानमसाला, रॉयल दुबई गुटखा, व्हीवन टोबॅको, आरएम्डी पानमसाला, एम् सेटेंड टोबॅको गोल्ड अशा गुटख्याचे 225 पॅकेट जप्त केले आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक सुधीर सावंत, पो.हे.कॉ.प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे, महिला पोलिस अंमलदार स्वाती सावंत या टीमने केली.अन्नसुरक्षा मानके कायद्याअंतर्गत शरीरास विघातक पदार्थ विक्री व साठा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.देवगड पोलिस स्थानकात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार गुरूनाथ तवटे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.
Comments are closed.