रोहित-विराटची कारकीर्द वेळेपूर्वीच संपवल्याचा कलंक, बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर न्यूज: बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, जर या दोघांनी या मालिकेत चांगले प्रदर्शन केले नाही, तर त्यांना संघातून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांना या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. पण आता अजीत आगरकर यांच्याबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्णय
बीसीसीआयने अजीत आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुढेही कार्यरत राहतील. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आगरकर जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता बनले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या आयसीसी विश्वचषकात अंतिम फेरी गाठली, तसेच 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या यशामुळे बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विजेतेपदे जिंकली, तसेच टेस्ट आणि टी20 स्वरूपात बदल घडले. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला असून, आगरकर यांनी काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव मान्य केला आहे.”
सध्याच्या निवड समितीत अजीत आगरकर यांच्यासोबत एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरत यांचा समावेश आहे. मात्र सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर या समितीत बदल होण्याची शक्यता आहे. शरत यांना समितीतून वगळले जाऊ शकते, तर दास आणि बॅनर्जी यांच्या पदांबाबतही पुनर्विचार होऊ शकतो. बैठकीनंतर बीसीसीआय नवीन नियुक्त्यांसाठी अर्ज मागवेल.
महिला निवड समितीतही बदल संभव
वरिष्ठ महिला आणि कनिष्ठ पुरुष निवड समित्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या महिला समितीत नीतू डेव्हिड, आरती वैद्य आणि मिंटू मुखर्जी यांचा समावेश आहे. या समितीने आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, बीसीसीआयच्या नियमानुसार हा कमाल कार्यकाळ आहे. त्यामुळे लवकरच नव्या सदस्यांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.