खेळात मागे, पार्टीत पुढे असणाऱ्या हर्षित राणावर चहूबाजूंनी टीकास्त्र, आता आर अश्विन म्हणतो, याच
आर अश्विन प्रश्न हर्शीट राणा: वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय (ODI) आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.
शुभमन गिलला भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार नेमण्यात आला आहे. या संघात वेगवान गोलंदाज हर्षित राणाची निवड करण्यात आली असून, त्यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. अनेक तज्ज्ञांनी हर्षित राणाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन याचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या घरी खास डिनर पार्टीचे आयोजन केली होती. ज्यामध्ये टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफचे सर्व सदस्य बसने गंभीर यांच्या घरी आले होते. या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हर्षित राणाने (हर्षित राणा न्यूज. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतानाही गंभीर यांच्या घरी पोहोचला. हर्षित राणाला अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले असून, त्यावर बरीच चर्चा रंगली होत की तो गौतम गंभीरचा लाडका आहे.
हर्षित राणा टीममध्ये का आहे? (Why is Harshit Rana in Team India?)
माजी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने राणाच्या निवडीवर थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “त्याची निवड का केली जाते आहे, हे मला समजत नाही. मला सिलेक्शन कमिटीमध्ये सहभागी व्हावंसं वाटतंय, म्हणजे त्याच्या समावेशामागचं कारण समजलं असतं. माझ्या मते, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला असा वेगवान गोलंदाज हवा जो फलंदाजीही करू शकेल. कोणीतरी त्याच्या फलंदाजीवर विश्वास ठेवतोय, म्हणूनच त्याला संभाव्य क्रमांक आठव फलंदाज म्हणून निवडले जात आहे.”
आर अश्विनने राणाच्या क्षमतेचं कौतुक केलं, पण त्याच वेळी निवडीवर शंका व्यक्त केली. त्याने म्हटले की, “त्याच्यात काही तरी एक्स-फॅक्टर आहे, हे मान्य. पण सध्या तो एकदिवसीय संघात निवड होण्याइतकं सिद्ध झाला आहे का, हा मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही त्याचा एखादा चेंडू खेळाल, तेव्हा कळेल की त्याच्यात काही वेगळं आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो राष्ट्रीय संघात स्थान मिळवायला पात्र आहे का, हे निश्चित सांगता येत नाही.”
हर्षित राणाचं आतापर्यंतचं प्रदर्शन
23 वर्षीय हर्षित राणाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये आपला कसोटी पदार्पण सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने चार बळी घेतले होते. मात्र, दुसऱ्या टेस्टमध्ये तो एकही विकेट घेऊ शकला नाही. तेव्हापासून तो पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची प्रतीक्षा करत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राणाच्या नावावर पाच सामन्यांत 10 बळी आहेत. त्याने आपला शेवटचा ODI सामना 23 फेब्रुवारी 2025 रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.