इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर शुबमन गिल! मोडणार या दिग्गजाचा रेकॉर्ड

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान खेळल्या जाणाऱ्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होईल. भारतीय संघ सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात शुबमन गिल इतिहास घडवू शकतो. तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने मागील सामन्यात अर्धशतकी पारी खेळली होती. आता तो दिल्लीच्या मैदानावर मोठे डाव खेळू शकतो.

शुबमन गिल जेव्हा पासून टीम इंडियाच्या कसोटी संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा निघत आहेत. तो इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. आता तो भारताचा कर्णधार म्हणून सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनू शकतो. गिल आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू डॉन ब्रेडमन यांनी केला होता. त्यांनी कर्णधार म्हणून फक्त 11 डावामध्ये आपले 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

आता जर गिल 196 धावा करू शकला, तर तो कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरेल. गिलने सध्या 10 डावामध्ये 805 धावा केल्या आहेत.

भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी 15 डावामध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

गिल उत्तम फॉर्ममध्ये आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात अर्धशतकी पारी खेळली होती. अशा परिस्थितीत तो दिल्लीच्या मैदानावर कमाल करू शकतो. अरुण जेटलीच्या पिच बद्दल बोलायचे झाल्यास, ही पिच फलंदाजांसाठी उपयुक्त असते. मैदानही खूप लहान आहे आणि येथील आउटफिल्डही खूप जलद आहे. त्यामुळे फलंदाजांना बाउंड्री मारणे सोपे जाते.

Comments are closed.