300 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला ‘कांतारा’

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर-1’ हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला. या चित्रपटाने आतापर्यंत 316 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ची जादू कायम आहे. ‘कांतारा’ने मंगळवारी 34.25 कोटी आणि बुधवारी 25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचे बजेट 120 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाने दुप्पट हून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट विकेंडला आणखी मोठी कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘कांतारा चॅप्टर-1’ हा 2022 मध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘कांतारा’चा प्रिक्वेल आहे.

Comments are closed.