भाजपमध्ये गेल्यावर हत्या गोळीबाराचे गुन्हे माफ होत असतील तर या देशाचं कायद्याचं पुस्तक कामाचं नाही, ते जाळावं लागेल – संजय राऊत

रामदास कदम यांच्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर व महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ”रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली आहे ती त्यांना गिळावीच लागेल” असा टोला देखील त्यांना लगावला.
”अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थित पणे एक भूमिका मांडली आहे. कदम व त्यांच्या चिरंजीवांनी जे घोटाळे आणि गुन्हे केले आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारे मंत्री काम करत असतील. तर देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहेत. स्वत: रामदास कदम यांनी सांगितले आहे की विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सुचटनेवरून संशयास्पद व्यक्ती घाय़वळला शस्त्र परवाना दिला. पोलीस आयुक्तांनी घायवळ याला परवाना देऊ नका असे सांगितले होते, जर तो अहवाल बाजूला ठेवून गृहराज्यमंत्री परवाना देत असतील तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे सरकार नाही तर गुंडांची टोळी चालवतायत. भाजपने राज्यातल्या सर्व गुंड टोळ्या आपल्या प्रचारात उतरवल्या होत्या. आजही गुंडांना, भ्रष्टाचारांना पोसणारा पक्ष म्हणून भाजपकडे बोट दाखवलं जातंय. नाशिकमध्ये ज्यांनी गोळीबार केला, त्यामध्ये काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेली लोकं आहेत, त्यांना अटक व्हायला हवी. भाजपमध्ये गेल्यावर खून हत्या गोळीबार चोरी असे गुन्हे माफ होत असतील तर या देशाचं कायद्याचं पुस्तक कामाचं नाही, ते जाळावं लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
Comments are closed.