आता टीव्ही मालिकांचा ओढाही Gen Z ला आकर्षित करण्याकडे; ‘लपंडाव’ मालिकेत लग्नसोहळ्यात खास सेलिब्रेशन, पण ‘उर्मिला’चा ठरलाय वेगळाच प्लान

OTT प्लॅटफॉर्म आणि वेबसिरीजकडील ‘Gen Z’ ला आपल्याकडे वळवण्यासाठी आता टीव्ही मालिकांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. स्टार प्रवाह वरील नवीन मालिका ‘लपंडाव’ने त्यासाठी पाऊलं उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे अभिनेत्री ‘श्रेया कुळकर्णी’ ने आपल्या नवीन प्रोजेक्ट बाबतची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. तोच नवीन प्रोजेक्ट म्हणजे स्टार प्रवाह वरील नवीन मालिका ‘लपंडाव’.
तिचे लपंडाव मालिकेतले ‘उर्मिला’ हे पात्र तिच्या चाहत्यांना खूप आवडतंय . श्रेयाने या आधी अनेक हिंदी मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तसेच स्वामी समर्थ, गाथा नवनाथांची, बाळूमामांच्या नावाने चांग भलं, शुभ विवाह अशा अनेक मराठी मालिका देखील गजवल्या आहेत.
लपंडाव मालिकेत आता सखीचे स्वयंवर आपल्याला दिसणार आहे. सखीच्या स्वयंवरात, श्रेयाने म्हणजेच उर्मिलाने आपल्या माहेरचा मुलगा प्लांट केल्याचे श्रेयाने एका मुलाखतीत सांगितले.
भव्य सोहळा आणि मनोरंजन या स्वयंवरात तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्वयंवर अगदीच GenZ पद्धतीचं असणार आहे. आजकालच्या GenZ जनरेशन ला आकर्षित करेल असे सीन्स या स्वयंवरात शूट झाले आहेत. श्रेया म्हणजेच लपंडाव मालिकेतली उर्मिला आता कसा तिचा डाव साधून माहेरच्या मुलाला जिंकवणार आहे हे पाहायला मिळेल.
लपंडाव मलिकेतली टीम ही ‘सखी’च्या स्वयंवरासाठी खूप उत्सुक आहे. मालिकेत अभिनेत्री श्रेया उर्फ उर्मिला ही सखीची काकू आहे. कामत एम्पायरची भावी सरकार तिला बनायचं असून त्या साठीच तिने स्वयंवरात तिचा डाव रचला आहे अशी श्रेयाने तिच्या पात्रा विषयी माहिती दिली.
Comments are closed.