काही जिहादी कुत्री एकत्र झाली होती; असदुद्दीन ओवैसींच्या सभेनंतर अहिल्यानगर नामांतरावरुन पडळकरा


असदुद्दीन ओवैसीवरील गोपीचंद पडलकर: एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची गुरुवारी (दि. 09) अहिल्यानगरच्या मुकुंदनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर या सभेत अहिल्यानगर जिल्ह्याचा ‘अहमदनगर’ असा वारंवार उल्लेख करण्यात आला. तर असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणाचा शेवट ‘आय लव्ह मोहम्मद’च्या नाऱ्याने केला. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एआयएमआयएम पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाही संकटांनी आक्रमक केले. हिंदू धर्मियांची विटंबना केली.  मात्र, काही घातक लोकांना ही जवळची वाटत आहेत. त्यांचे प्रेम उफाळून येत आहे.  अशा देशविघातक सुलतानी प्रकृतींना बाजूला करत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. काही बांडगुळांना जिहादी लोकांचे प्रेम उफाळत आहे. ते डोकं वर काढू पाहात आहेत. जिहादी औलादांना गाडत त्यांच्या थडग्यावर भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.

Gopichand Padalkar on Asaduddin Owaisi: अहमदविषयी प्रेम असले तरी अहिल्यानगरच म्हणावे लागेल

अहिल्यादेवींचे काम देशाला माहिती आहे, त्यांचे जगभरात नाव आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे नेली, दडपण दूर करत मायेचा आधार केला. अशा अहिल्यादेवींचे नाव अहमदनगरला दिलंय ते कोणीही पुसून काढू शकत नाही. काल काही जिहादी कुत्री एकत्र झाली होती, कितीही संख्येने जिहादी एक आले तरी ते नाव पुसून काढू शकत नाही. अहमदविषयी प्रेम असले तरी अहिल्यानगरच म्हणावे लागेल. ईश्वरपूर, अहिल्यानगर आणि संभाजीनगर नावाचा ज्यांना त्रास होतोय ते देशविघातक आणि देशविरोधी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

Ruhinaz Shaikh: ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय शिवराय’चा नारा

दरम्यान, एआयएमआयएमच्या पदाधिकारी रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय शिवराय” ने केली होती.  सोबतच यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, एक बुरखेवाली इथे आल्यानंतर “जय शिवराय” कसं म्हणू शकते? असं काहींना वाटलं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि अठरापगड जातीला सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं. त्यातून मुसलमानांना बाजूला करण्याचं काही लोक प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, आम्ही इथून एक इंच ही हटणार नाही, असं त्यांनी म्हटले. रुहीनाज शेख यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nitesh Rane: वारीस पठाण यांची थेट स्ट्रेचरवर जाशील अशी धमकी; आता नितेश राणेंचं जशास तसं उत्तर; म्हणाले, ‘जागा, वेळ, किंवा मस्जिद निवडा, धमक्या…’

आणखी वाचा

Comments are closed.